देश विदेशात परिचारिकांना नौकारीच्या अनेक संधी – अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. देशपांडे

देश विदेशात परिचारिकांना नौकारीच्या अनेक संधी - अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. देशपांडे

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या परिचारिकांना तातडीने नौकरी उपलब्ध होत आहेत, देश विदेशात परिचारिकांना नौकरीच्या अनेक संधी प्राप्त होत आहेत. परिचारिकांना नोकरी सोबतच आपण करीत असलेल्या सेवेचे समाधान मिळते. यामुळे परिचारिकांचे महत्व अनन्य साधारण आहे. कोविड काळामुळे लोकांना आता परिचारिका सेवेचे महत्व समजले आहे. देश विदेशसह आपल्याकडे परिचारिकांना आता सन्मानाची वागणूक दिली जात आहे. असे अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांनी मातृभूमि महाविद्यालयातील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले. मातृभूमी प्रतिष्ठान अंतर्गत मातृभूमी नर्सिंग स्कूल आणि कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मध्ये दीप प्रज्वलन, प्रतिज्ञा समारंभ आणि विद्यार्थी स्पर्धांचा शुभारंभ ता. १४ शनिवारी करण्यात आला. परिचारिका दिनानिमत्या आयोजित विविध कार्यक्रम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. भारताच्या नकाशाची काढलेल्या रांगोळी भोवती मेणबत्ती लावून, केक कापून फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनुराधा वर्मा, सामान्य रुग्णालय परिसेविका वंदना क्षीरसागर होते तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सतीश उस्तुरे होते. परिचारिका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून परीसेविका वंदना क्षीरसागर यांनी प्रतिज्ञा म्हणून घेतली. सर्व परिचारिकानी रुग्ण सेवा चांगली करता यावी यासाठी योगा करणे आवश्यक असून यामुळे घर व नौकरी याचे संतुलन करणे शक्य होते. रुग्णांना एकेरी हाक अथवा नावाने हाक न मारता माय, बाबा, मावशी, असे आदरार्थी शब्द वापरल्याने रुग्णाचा अर्धा आजार कमी होतो आणि आपुलकी वाढते असे वंदना क्षीरसागर यांनी सांगितले. प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी सुञसंचलन केले तर प्रा. रेखा रणक्षेञे यांनी आभार मानले. यावेळी आकाश राठोड, प्रा. रणजित मोरे, प्रा सय्यद उस्ताद, प्रा शशिकांत शेळकिकर, नंकिशोर बयास, दयानंद टाके, देवा डोंगरे, ओंकारे जगदीशा, चौधरी अमृता, भगत श्रद्धा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

About The Author