मी सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे – ना. संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगिले) : मी राज्यमंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून नव्हे तर आपल्या सर्वसामान्य जनतेचा पाईक म्हणून आपल्या सेवेत सदैव तयार आहे. मतदारांनी निवडून दिल्यामुळे माझ्यावर मोठा विश्वास दाखवल्यामुळे, आज मी मंत्री झालो असलो तरी मला माझ्या जनतेने माझ्या मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, मला दिलेले प्रेम हे सदैव आठवणीत राहून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे. मंत्रिपदे राजकीय अधिष्ठान असले तरी पदामुळे मी तोऱ्यात राहणार नाही, तर मी जनतेचा सेवक आहे.
आपल्या ग्रामीण भागात दर वर्षाला आपण सालगडी बदलतो. एखादा सालगडी चांगला वाटल्यास त्याला वर्षानुवर्ष कायम ठेवत असतो. त्याला घरच्यासारखे वागवतो. तशाच पद्धतीने मी आपल्या सेवेत सदैव तत्पर राहणार आहे. असे प्रामाणिक विचार उदगीरचे आमदार तथा राज्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील एसटी कॉलनी विभागात नवीन वसाहत मलकापूर येथे नीलकंठेश्वर मंदिर येथे उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. सर्वप्रथम ना. संजय बनसोडे यांनी श्री नीलकंठेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने नामदार संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ.मल्लेश झुंगा स्वामी, शेख समीर, शंकरराव भालके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की, ज्या विश्वासाने मतदारांनी मला निवडून दिले आहे. तो विश्वास मी कायम ठेवणार आहे. त्या विश्वासाला मी पात्र राहीन. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करीन, यासाठी जनतेने वेळोवेळी मला सूचना कराव्यात. जनतेच्या सूचना या माझ्यासाठी मार्गदर्शक असल्याचेही या प्रसंगी त्यांनी सांगितले.
जनतेची सेवा करण्यासाठी मतदारांनी निवडून देत दिले आहे. मी स्वतःला मालक कधीही समजणार नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, आपण जनतेची सेवा करण्यासाठी मला संधी दिली आहे. याची जाणीव ठेवून जनतेचा सेवक म्हणूनच कायम काम करणार आहे. मलकापूर ग्रामपंचायत वसाहतीचा विकासासाठी उपसरपंच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील अत्यंत चांगले काम करत आहेत. त्यामुळे विविध विकास कामांना गती मिळाली आहे. या विकास कामासाठी लागेल तसा निधी आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. नीलकंठेश्वर मंदिर स्थापना उत्सवानिमित्त पारायण, कीर्तन बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे प्रवचने, व्याख्याने ठेवण्यात आले आहेत. उपक्रमाच्या आयोजनाबद्दल मंदिर समितीचे अभिनंदन ही ना. संजय बनसोडे यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे यांनी केले. संचलन प्राध्यापक संग्राम घोगरे यांनी तर आभार विजया मठपती यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बसवराज बंडे, ज्ञानेश्वर सावळे, शिवराज पाटील, वैजनाथ बदनाळे, अंतेश्वर तोडकरी, दीपक चिद्यरवार, शिवाजी सावंत, शिवलिंग पडोळे, दिलीप कोटलवार, ललिता भुरे , सुवर्णा कडोळे, सूर्यकांत बेलुरे, मनोज भंडे, पवार यांच्यासह महिला मंडळांनी परिश्रम घेतले.