तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंदे सुरू करावेत – दिलीपराव देशमुख मालक
लातूर (एल. पी. उगिले) : सद्यस्थितीत देशामध्ये सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .नोकरीच्या संध्या कमी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता नवीन नवीन उद्योग धंदे उभा करून इतरांना नोकरी देणारे उद्योगी, व्यवसायिक बनावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश नेते दिलीपराव देशमुख मालक यांनी व्यक्त केले.
ते अहमदपूर येथील भगीरथी ड्रायक्लिनिंग फॅक्टरीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तसेच युवक शुभम भालेराव यांनी हिम्मत करून उद्योग व्यवसाय सुरू केल्याबद्दल दिलीपराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. शुभम भालेराव यांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा. आणि आपले वेगळेपण जपावे. असेही आवाहन याप्रसंगी दिलीपराव देशमुख मालक यांनी केले. याप्रसंगी केवळ भारतीय जनता पार्टीचे नव्हे तर इतरही राजकीय पक्षाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.