पुणे सातारा रोड वर खुले आम मटका सुरु पोलीस प्रशासन बेखबर
पुणे (प्रतिनिधी) : पुणे सातारा रोड पंचमी हॉटेल समोर खुले आम अवैध धंदा चालु असुन पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.सातारा रोड पंचमी हॉटेल च्या मुकुंदनगर रोड लगत हा अवैध मटका धंदा चालु आहे शेजारीच सिटी इंटरनॅशनल स्कूल आहे . रस्त्याच्या कडेला रिक्षा लावुन यामध्ये मटका घेतला जातो. रिक्षा नं. MH:12 8072 हि रिक्षा पोलीसांना दिसत नाही कि जाणुन बुजुन ते याकडे दुर्लक्ष करतात हे जाणुन घेणे गरजे चे आहे. पोलीस आयुक्त सतत या अवैध मटका चालविणाऱ्यांवर कारवाई करत असतात पण तरी देखिल मटका हा चालुच आहे. हा परिसर स्वारगेट पोलीस स्टेशन च्या हद्दी मध्ये आहे पोलीसांना याची माहिती नाही का. वरिष्ठांनी ताबडतोब कारवाई करून वेळीच याला आवर घालावा.
