लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप 2022 जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्साहात सुरवात

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप 2022 जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्साहात सुरवात

जिल्हा क्रीडा संकुल येथे तरुणाईची मोठी उपस्थिती

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर तरुणाईच्या जल्लोषात व उत्साही वातावरणात ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेला आजपासून सोमवार २३ मे पासून सुरवात झाली असून यानिमित्ताने क्रीडा संकुल तरुणाईच्या उपस्थितीने फुलले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कोण पटकावणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून लातूर ग्रामीणचे आमदार आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यात व लातूर शहरात असे मिळून ११ ठिकाणीं ही स्पर्धा झाली. यात प्रथम क्रमांक पटकावलेला संघ लातूर येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याचा प्रारंभ आज करण्यात आला शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सोपान जटाळ यांच्या हस्ते नाणेफेक करून जिल्हास्तरीय स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटी वन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीेचे सचिव अभय साळुंखे, जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, बँकेचे संचालक मारुती पांडे, क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, चंद्रकांत मद्दे, युवक शहर काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, भागवत फुले आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय स्पर्धेची सुरवात अहमदपूर आणि निलंगा तालुक्यात रंगलेल्या सामन्याने झाली. त्यानंतर जळकोट आणि चाकुर, लातूर तालुका आणि उदगीर, रेणापूर आणि देवणी यांच्यात सामना रंगला. क्रीडा संकुल येथे २५ मे पर्यंत या जिल्हास्तरीय स्पर्धा रंगणार आहे.

मैदानी खेळाची आवड पुन्हा वाढेल – डॉ जटाळ यांचे मत

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा तरुणांना चांगलाच फायदा होईल. शिवाय, मैदानी खेळाची आवडही वाढीस लागेल. विलासराव देशमुख हे अष्टपैलू होते. त्यांना खेळाची आवड होती. तशीच आवड युवक आमदार धिरज देशमुख यांनी जोपासली आहे. हे या स्पर्धेत दिसून येते जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून हळूहळू मैदानी खेळाची आवड या स्पर्धेमुळे युवकांना होणार आहे असे डॉ. जटाळ यांनी यावेळी सांगितले.

About The Author