नळगीर येथे कृषी दिन उत्साहात साजरा,शेतकऱ्यांचा सन्मान आणि जनजागृती रॅलीने कार्यक्रम गाजला
उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील मौजे मौजे नळगीर येथे ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरा करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
माजी मुख्यमंत्री व कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा कृषी दिन ग्रामीण कृषी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करतो.
या कार्यक्रमात शेतकरी सन्मान, कृषी तंत्रज्ञान परिसंवाद, मार्गदर्शन सत्र, तसेच जनजागृती रॅली यांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पर्यावरणपूरक शेती,आधुनिक कृषी तंत्रज्ञान,आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांवर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन हे शेती क्षेत्रातील नवप्रवर्तन, शेतकऱ्यांचा आत्मसन्मान, आणि तरुणाईमध्ये कृषी विषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.
सदरील कार्यक्रमामध्ये वृक्ष दिंडी काढून पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यात आली व त्यासोबतच वृक्ष लागवड करुण “झाडे लावा, जीवन वाचवा “हा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात गायकवाड सौरव, गायकवाड व्यंकटेश, निलेश देवकते, विशाल धोत्रे, देवकर विक्रम, घार जयप्रकाश, गुंडुरेड्डी हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावचे सरपंच , कृषी सहाय्यक , ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि गावातील शेतकरी यांनी मोलाची साथ दिली.
उपक्रमाचे समन्वयक डॉ. एस. एन. वानोळे, प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. नवले तसेच सहभागी प्राध्यापक डॉ. के. पी. जाधव व प्रा. पी. एल. सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
