कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथे कृषि दिन उत्साहात साजरा

0
कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथे कृषि दिन उत्साहात साजरा

उदगीर, (एल पी उगिले)-वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (परभणी ) सलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालयात कृषि दिन उत्साहात साजरा केला. महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयामध्ये प्रथमता वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर महाविद्यालय प्रक्षेत्रावर स्वच्छता मोहीम काढण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षिका सौ. बबिता वारद, डॉ. शिवशंकर वानोळे, डॉ. दीपक पानपट्टे, डॉ.विजय शिंदे, डॉ. करण जाधव, डॉ. शिवाजी माने, प्रा. प्रमोद सराफे, प्रा. बळीराम निम्मणवाड, बालाजी बिरादार तसेच माविद्यालयातील सर्व कर्मचारी व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!