आई-वडिलांनी विद्यार्थ्यांचे मालक न होता पालक बनावे- देऊळगावकर

0
आई-वडिलांनी विद्यार्थ्यांचे मालक न होता पालक बनावे- देऊळगावकर

उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यातील मुख्याध्यापकांसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी उपस्थित राहून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू विशद केले. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मलिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष माधवराव नौबदे, सदस्य मलिकार्जुन मानकरी, ॲड.अजय दंडवते, बसवराज पाटील मलकापूरकर, इंजि.मनमथ बिरादार, शिवाजीराव हुडे, शिवराज वल्लापुरे, नाथराव बंडे, प्रशांत पेन्सलवार, दिलीप चौधरी, भीमाशंकर मुद्दा, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज पाटील कोळखेडकर, भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश पाटील देवणीकर, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी देऊळगावकर यांनी भारताच्या प्राचीन विद्यापीठांचा वारसा आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत, शिक्षणात परिवर्तनासाठी सर्व क्षेत्रांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. मस्के यांनी शाळा व महाविद्यालय यांच्यातील समन्वयाचे महत्व अधोरेखित केले, तर अध्यक्षीय भाषणात नागराळकर यांनी महाविद्यालय शाळांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. या वेळी सहभागी मुख्याध्यापकांचा व माजी विद्यार्थी रतिकांत संतपुरे यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. चर्चासत्रात विषय प्रवर्तन डॉ. कमलाकर गव्हाणे, पाहुण्यांचा परिचय डॉ. गौरव जेवळीकर, सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे व आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद जालनापूरकर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!