महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे ग्रामीण व कृषी विकासासाठीचे योगदान स्पष्ट केले. त्यांनी घेतलेली जलसंधारण, शेती साक्षरता आणि हरित क्रांतीची धोरणे आजही प्रेरणादायक आहेत. यावेळी ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ. ए. पी. मोरे, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर उपस्थित होते.
