शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा बँक खंबीरपणे उभी राहिल – दिलीपराव देशमुख

शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा बँक खंबीरपणे उभी राहिल - दिलीपराव देशमुख

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नवनिर्वाचित जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सदस्यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत लोकांनी मोठया अपेक्षेने आपल्याला निवडून दिले आहे आपल्यावर विश्वास ठेवला आहे वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते मंगळवारी आशियाना निवासस्थानी देवणी तालुक्यातील जवळगा, लातूर तालुक्यातील गुंफावाडी येथील नूतन विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी केला त्यावेळीं ते बोलत होते.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, काँग्रेसचे मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष हरीराम कुलकर्णी, विजय पाटील, संजय रेड्डी, अनिल पाटील, जवळगा विविध कार्यकारी सोसायटी चे नूतन चेअरमन शेषराव पाटील, सोसायटीचे उपाध्यक्ष ब्रम्हानंद रेड्डी, संचालक प्रा. रामलिंग मुळे, देविदास जाधव, बालाजी गंभीरे, संजय येडले, शिवाजी सोनकांबळे, व्यंकट बोडके, लताताई बिरादार, दैवशाला पाटील, संजय बिरादार, दामोधर जाधव, श्रीधर धानुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author