अजिंक्य बिराजदार आंतरराष्ट्रीय एशियन लाठी स्पर्धेसाठी नेपाळला रवाना
लातुर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील इयत्ता अकरावी वर्गात शिकणारा अजिंक्य बाळासाहेब बिराजदार यांची आंतरराष्ट्रीय एशियन लाठी स्पर्धेसाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय एशियन लाठी स्पर्धेकरीता अजिंक्य बिराजदार सोमवार दि. 24 मे रोजी स्पर्धेसाठी नेपाळला रवाना झाला. सदरील स्पर्धा दि. २७ ते २९ मे २०२२ या कालावधीत काठमांडू नेपाळ येथे संपन्न होत आहे. आंतरराष्ट्रीय एशियन लाठी स्पर्धेसाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवासासाठी रु. 25000/- आर्थिक साह्य संस्थेच्या वतीने देण्यात आले. या निमित्ताने दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष ललितभाई शहा, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अशोक वाघमारे, प्रा. सुरेश क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.