लातूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण अहवाल जाहीर करावा

लातूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण अहवाल जाहीर करावा

राष्ट्रवादी अर्बन सेल, माहिती तंत्रज्ञान विभागाची आयुक्तांकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण अहवाल जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे व जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे राष्ट्रवादी अर्बन सेल, राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने करण्यात आली. शहरात पर्यावरण समतोल राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने दरवर्षी पर्यावरणाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. लातूर शहराचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आलेला असेल तर पूर्वीच्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी केली का ? प्रदूषण पातळी वाढली आहे ? ढासळणारे पर्यावरण संतुलन शहरासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, नागरिकांच्या आरोग्यासाठी पर्यावरण संतुलन टिकवणे महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. दरवर्षी सविस्तर आढावा घेऊन पर्यावरण अहवाल प्रशासनाला सादर करावा लागतो.

शहरातील पर्यावरण अहवालात शहराची लोकसंख्या,मागील अहवालाचा फेरआढावा, शहराची भौगोलिक स्थिती, तापमान, जैवविविधता, रस्तेमार्ग, झाडांची संख्या, उद्याने, जमिनीचा वापर, कचऱ्याचे स्त्रोत ते विल्हेवाट, पर्यावरण धोरण अशा प्रमुख मुद्यांचा समावेश असतो. घातक घटकांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामांची माहिती व अहवालात नमूद असते. या अहवालानुसार मनपा प्रशासनाने वर्षभर उपाययोजना करणे गरजेचे असते म्हणून मनपा प्रशासनाचे ‘एन्व्हॉर्नमेंट ऑडिट’ गरजेचे आहे.

About The Author