व्ही एस पँथर्स चा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

व्ही एस पँथर्स चा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

विवाह सोहळ्यात २९ जोडपी विवाहबध्द

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील व्ही एस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा विवाह सोहळा शानदार संपन्न झाला असून या विवाह सोहळ्यामध्ये २९ जोडपी विवाहबद्ध झाले.

या सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ पदमश्री उज्वल निकम, राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. सुधाकर शृंगारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, नगरसेवक परिषदेचे राज्याध्यक्ष रामभाऊ जवळगे, पुणे मनपा सदस्य अण्णा मस्के, विधिज्ञ अनिकेत निकम भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, विधिज्ञ विनोद मुळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदर, डॉ सिद्धार्थ सूर्यवंशी, मुन्ना कांबळे, विधिज्ञ सचिन जावळे, अमोल लोहार यांसह इतर मान्यवर उप- स्थित होते.

या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक धर्माच्या परंपरेनुसार धार्मिक विधीसह विवाह संपन्न करण्यात आला यावेळी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष विनोद खटके म्हणाले की माझ्या संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता माझा श्वास आहे. त्यांच्या जोरावरच मी अशा प्रकारचे उपक्रम यशस्वीरित्या राबवू शकतो. नव वधूना लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर आनंदी संसार थाटायचा आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले . तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाबद्दल संघटनेच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, प्रदेशाध्यक्ष तथा मनपा सदस्य सचिन मस्के, प्रदेश सचिव

अमोल सुरवसे संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाध्यक्ष बालाजी बनसोडे ग्रुप अध्यक्ष अमोल कांबळे, किरण पायाळ, असद शेख, गौसभाई शेख निलेश कांबळे, विशाल गायकवाड, विधिज्ञ प्रतीक कांबळे, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष किरण किवंडे, शरद किणीकर, दाजी कांबळे, राज मस्के, लक्ष्मण कांबळे महेश कांबळे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष खलीभाई थोरात, अंबेजोगाई तालुकाध्यक्ष बालाजी सरवदे, कळंब तालुकाध्यक्ष गायकवाड यांच्यासह गोपाळ कांबळे, रवि कांबळे, सुरज सूर्यवंशी, मनोज गायकवाड, अतुल होळकर, उमेश गायकवाड, पंकज पाचपिंडे, श्रीहरी केंद्रे, मिलिंद सरवदे, विनोद वाघचौरे यांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author