राजीव गांधी ते बसेवश्वर चौकातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल तात्काळ रद्द करा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर ते नागपूर हा रिंगरोड राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौकातून जात आहे. या मार्गावर उड्डाणपूल होत असल्यामुळे रस्त्यांच्या बाजूचे व्यवसाये पूर्णपणे बसणार आहेत. त्यामुळे लातूर शहरातील अनेक व्यापार्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने याबाबत फेरविचार करून तुळजापूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.361 या मार्गावरील उड्डाणपूल तत्काळ रद्द करावा. अशा मागणीचे निवेदन भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर ते नागपूर हा रिंगरोड राजीव गांधी चौक मार्गे बसवेश्वर चौकातून जात आहे. याचे कामही प्रगतीपथावर सुरु आहे. परंतु याच मार्गावर उड्डाणपूल होत असल्यामुळे या मार्गावरील आजूबाजूंचे व्यवसाय पूर्णपणे बसणार आहेत. यामुळे राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक यादरम्यान विविध व्यवसायांसाठी वसलेल्या व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला छोटे-मोठे व्यवसाय करणार्या व्यापार्यांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर ते नागपूर हा लातूर शहरातील जाणार्या मार्गावरील उड्डाणपूल तत्काळ रद्द करावा आणि या मार्गावर वसलेल्या व्यावसायीकांना दिलासा मिळावा याबाबतचे निवेदन यापूर्वीही केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी व राष्ट्रीय महामार्गाचे वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. यासंदर्भात माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचे लातूरचे जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलने झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर ते नागपूर जाणार्या लातूरातील मार्गावर उड्डणपूल उभारण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला होता. पंरतु नंतरही व्यापार्यांमध्ये कायम संभ्रम असल्याची चर्चा समोर येत आहेे. त्यामुळे तुळजापूर ते नागपूर जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील लातूर शहरातील उड्डाणपूल तत्काळ रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्गाचे नागपूरचे वरीष्ठ अधिकारी अतुल कुमारजी पाटील यांच्याकडे केली व त्याच मागणीचे निवेदन भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना दिले. यावेळी व्यापारी गणेश बिडवे, अभिजीत चौंडे, दीपक गोडभरले, सोनवणे, निळकंठराव पवार, सुभाषअप्पा सुलगुडले, यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.