उष्णतेच्या लाटेने पासून आणि उष्माघातापासून बचाव करा – डॉ शरदकुमार तेलगाणे
उदगीर (एल.पी. उगिले) : सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा असला तरी अजूनही उष्णता कमी झालेली नाही, वरकरनी आपल्याला उष्णता जाणवत नसली तरीही उष्णतेची लाट निर्माण होऊ लागलेली आहे. सरासरी तापमानापेक्षा साधारण चार ते साडेसहा अंशने तापमान जास्त नोंदवले गेल्यास उष्णतेची लाट आली असे म्हणतात. अशी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. असे विचार डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.
सध्या वातावरणातील तापमानात वाढ होऊ लागल्याने शरीरातील पाणी कमी होऊन अशक्तपणा जाणवायला लागतो, सर्वसाधारण नागरिकांचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते. हे तापमान खूपच वाढल्यावर मेंदूतील रक्ताभिसरनावर व शरीरातील इतर रसायनआवर प्राणघातक परिणाम होऊ शकतो. शरीरातील अंतर्गत तापमान मेंदूतील हियपोठोमस त्या भागा द्वारे नियंत्रित केले जाते.
उष्णते ने शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला उष्णता तणाव असे म्हणतात. थकवा, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, अस्वस्थ वाटणे, त्वचा कोरडी पडणे, मळमळ होणे, उलट्या होणे अशा पद्धतीची लक्षणे उष्माघाताचे आहेत. अतिउष्णतेने मानसिक व शारीरिक आरोग्य आयुष्यातील समाधान, आनंद, आकलनशक्ती, कामगिरी, बुद्धी इत्यादीवर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असेही आव्हान डॉ .शरद कुमार तेलगाने यांनी केले आहे. उन्हाळ्यामध्ये आहार-विहार जपून केला पाहिजे.
या काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते म्हणून शारीरिक व मानसिक रोग प्रतिकारशक्ती टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात नैसर्गिक भूक कमी होते त्यामुळे पचनास हलका आहार घ्यावा. आहारात सामान्यता गोड, आंबट व खारट ,रस युक्त पदार्थांचा वापर अधिक करावा, असेही त्यांनी सुचवले आहे.