निराधारांना आधार देण्यासाठी समाधान शिबीर चांगला उपक्रम – गणपतराव बाजूळगे

निराधारांना आधार देण्यासाठी समाधान शिबीर चांगला उपक्रम - गणपतराव बाजूळगे

प्रभाग १७ मधील संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिराचे आयोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे, हा चांगला उपक्रम असल्याचे संत शिरोमणी मारूती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजूळगे म्हणाले, बुधवार दि. २५ मे रोजी त्यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील विशाल प्रा.शाळा, प्रगती नगर, लातूर येथे समाधान शिबीराचे उदघाटन झाले आहे.

यावेळी व्यासपीठावर लातूर शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख, विलास बॅकेचे संचालक प्रविण घोटाळे, दगडूआप्पा मिटकरी, अनुप मलवाड, नेताजी देशमुख, माजी नगरसेवीका उषा घोटाळे, गणेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी पांडूरंग कोळगे, नायब तहसीलदार भिमाशंकर बेरूळे, मंडळ अधिकारी श्री झाडे, तलाठी डी.आर.शिंदे, महाइसेवा केंद्राचे कर्मचारी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, तहसीलचे कर्मचारी, निराधार महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.

निराधारांना आधार देण्यासाठी समाधान शिबीर चांगला उपक्रम - गणपतराव बाजूळगे

यावेळी समाधान शिबीराचे उदघाटक चेअरमन गणपतराव बाजूळगे म्हणाले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात निराधारांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. लातूर शहरात कोणताही निराधार लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राबविण्यात येत असलेला उपक्रम चांगला असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नेहमी नेतृत्वाने दिलेल्या विधायक कामात सक्रीय राहतो. आदरणीय विलासराव देशमुख, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी दाखविलेल्या कल्याणकारी वाटेनीच काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी पूढे जात आहे यांची ग्वाही या समाधान शिबीराच्या आयोजनातून मिळत आहे. या शिबीराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निराधारांना आधार मिळत आहे.

सक्षम हातात पालकत्व – ॲड. किरण जाधव

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यावेळी बोलतांना म्हणाले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून संजय गांधी निराधार अनुदान योजना आयोजित करण्यात येत असलेल्या समाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थीच्या घरापर्यंत पोहतच आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या हाताची केवळ निवडणुकी पुरती साथ नाही तर हा हात सर्व सामान्य जनतेच्या सोबत कायम आहे असे सांगितले.
कोरोना संकट आले त्यावेळी आपल्या सर्वाच्या आरोग्याची काळजी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतली. एवढे मोठे संकट आले त्यातून सर्वांना सुरक्षीत बाहेर काढले कारण सुरक्षीत हातात आपल पालकत्व ना. देशमुख यांच्याकड होत अस ॲड. किरण जाधव म्हणाले. सदया केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामूळे महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाई मूळे मिळणारे अनुदान खुप कमी आहे. याकरीता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान वाढविण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येईल असे बोलतांना त्यांनी सांगितले.

समाधान शिबीरातून ७ हजारापेक्षा अधिक लाभार्थीची निवड


उत्पन्नाचा दाखला देण्याची अट शिथील करण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देणार यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख म्हणाले की, लातूर शहरातील १५ प्रभागात आता पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पात्र लाभार्थींना अनुदान मिळवून देण्यासाठी शिबीर घेण्यात आले. सर्व लाभार्थ्यांना संपर्क करून त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निराधाराना शून्य रुपयामध्ये खाते उघडून दिले. या शिबिरामुळे ७ हजार पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे.

या अगोदरच्या सरकारने लाभार्थींनी उत्पन्नाचा दाखला दाखल सादर करण्याची जाचक अट घातली आहे. एवढया लवकर हे प्रमाणपत्र सादर करणे शक्य नाही, यामुळे उत्पन्नाचा दाखला देण्याची अट शिथील करण्यासाठी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी चेअरमन हकीम शेख यांनी सांगितले.

प्रभाग १७ मधील शिबीर यशस्वीतेसाठी प्रविण घोटाळे, प्रा.संजय जगताप, अनुप मलवाड, ॲड.महेश कोकणे, शिवाप्पा कोरके, सागर मुसाडे, अमित जाधव, हनीफ पठाण, योगेश देशमुख, सौरव खरोसेकर, नागेश गिरी, सुरज पांचाळ, भालचंद्र सोनकांबळे, विवेक मोरे, ओमप्रकाश जोशी, संकेत उटगे, संतोष पोददार, राजू राठोड, पवन हेबाडे, उमाकांत राठोड, अक्षय चव्हाण, प्रभाग कार्यालय समन्वयक राहूल इंगळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.सी.पाटील तर आभार प्रा.संजय जगताप यांनी करून उपस्थित सर्वांचे शेवटी त्यांनी आभार मानले.

About The Author