वाळू चोरांची दादागिरी वाढली; शेतकऱ्याच्या अंगावरुन ट्रॕक्टर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न

वाळू चोरांची दादागिरी वाढली; शेतकऱ्याच्या अंगावरुन ट्रॕक्टर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न

शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल, तीघांना अटक तर एक फरार

किल्लारी (प्रतिनिधी) : तेरणा नदीपात्रातील वाळू उपसा लिलाव झाला नसला तरी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. नदी शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात साचलेल्या वाळूची चोरी करत असताना अडवायला गेलेल्या शेतकऱ्यालाच अंगावरुन ट्रॕक्टर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार वाळू चोरांवर मंगळवारी ( ता. २४ ) शेतकऱ्याच्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, किल्लारी येथील तेरणा नदीपात्र मोठे असून या पात्रात व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साचते. सोमवारी ( ता. २३ ) सायंकाळी शेतातील दरडीमधून ती वाळू चोरून उपसा करून घेऊन जात असताना शेतकरी मालक बाळू चंद्रकांत बिराजदार यांच्या सर्वे नंबर १९८ ( ब ) मध्ये विरोध केला. त्यावर वाहतुकदार भांडण करत वाळू आसलेली जागा तुझ्या बापाची आहे. का? तुला जे करायचे ते कर असे म्हणत शिवीगाळ करत अंगावरून नंबर प्लेट नसलेले हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर घालून तुला ठार करून वाळू घेऊन जाईन असे धमकावले. घाबरलेल्या शेतकऱ्याने मुलास घटनास्थळी बोलावून घेत वाळू घेऊन जाण्यास विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांच्या मुलाच्या गच्चीला धरून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडणाचा आवाज ऐकूण आजूबाजूचे शेत शेजारी भांडण सोडविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते त्यावेळी त्यांनाही वाळू वाहतूक दाराकडून शिवीगाळ  करत ट्रॕक्टर अंगावर घालण्याची मनशा बोलुन दाखवली. यावेळी वाळू चोरणाऱ्याच्या फोनवर वाहतुक दाराने फोनवरुन शेतकऱ्यांला धमकावण्यात आले. हे ट्रॕक्टर माझे आहे. ते सोडून दे, तलाठी व तहसिलदार यांना फोन का केला. असे म्हणत अंगावर ट्रॕक्टर घालुन ठार करुन पळुन जाण्याची व खल्लास मारण्याची धमकी वाळू चोरांनी दिले. असता यावेळी शेतकऱ्यांचा मुलगा रामानंद उर्फ रोहित हा ट्रॕक्टरची चावी घेताना चालकाने लाथ मारुन खाली पाडले व ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावरुन ट्रॕक्टर घालून पळून गेला. असल्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावेळी शेतकऱ्याच्या मुलाच्या कमरेवर, पोटावर, हातावर, डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला सदरील मुलाला किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी शेतकरी बाळू चंद्रकांत बिराजदार राहणार किल्लारी यांच्या फिर्यादीवरून महादू शशिकांत पांढरे, सुधाकर सहदेव दंडगूले, दिलीप दंडगूले, मधुकर दंडगूले सर्व राहणार वडार वस्ती किल्लारी यांच्याविरुद्ध किल्लारी पोलिसात गुरनं 121/2022 कलम 307,511, 323, 504, 506,507, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.

About The Author