२५ मे जागतिक थॉयराईड दिनानिमित्त ७६ रूग्णांची मोफत तपासणी
लातूर (प्रतिनिधी) : डॉ. शेळके यांच्या २०१० पासूनच्या थॉयराईड या आजाराला समुळ नष्ट करण्याच्या संकल्पनेतून तयार केलेले क्लीनिक मार्फेत आयोजित मोफत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर डॉ. रवीश सोनी, कॅन्सर तज्ञ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ. स्वाती शेळके यांच्या मागदर्शना खाली शिबिर संपन्न झाले. डॉ. शेळके यांनी यावेळी ७६ रूग्णांवरती मोफत उपचार केले.
यावेळी असे लक्षात आले की, थॉयराईडच्या आजाराच्या बाबतीत असूनही जनसामान्यामध्ये खुप गैरसमजूती आहेत. आपल्या या आधुनिक जीवन शैलीमुळे व फवारण्यांमुळे गलगंड व इतर थॉयराईडचे आजार बळवत आहेत. यामध्ये अल्प दरात रक्त, सोनग्राफी व थॉराईडच्या ग्रंथेतील गाठितील पाणी काढणे ही सोय दिली गेली तसेच अत्यंत गरजू १५ रूग्णांना माफक दरात ऑपरेशनची सोय करून देण्यात आली. यामध्ये सर्व हॉस्पीटलच्या स्टॉफ व ज्यांनी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. त्याचे आभार डॉ. शेळके यांनी व्यक्त केले.