पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाचा निर्घुण खुन
पुणे (रफिक शेख) : महाराष्ट्र पोलीस दलाच्या कारागृह विभागात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाचा निर्घुण खुन केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.हि घटना हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे मंगळवारी ( ता.२४) संध्याकाळी साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडीस आली. गिरीधर उत्रेश्वर गायकवाड( वय २१) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मृताचा भाऊ निखिलकुमार उत्रेश्वर गायकवाड ( वय २७) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा खुन एका तरुणीसह पाच जणांनी केल्याचा संशय आहे. मृत गिरीधर गायकवाड ( रा. गोपाळपट्टी पार्क साई टॉवर मांजरी मुळ रा. उरुळी कांचन) याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणुन कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहीतीनुसार . मृत गिरीधर हा मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घरी बसला होता. त्यावेळी त्याला एका मुलीचा फोन आला. त्यानंतर तो घराबाहेर पडत असताना भाऊ निखिलकुमार याने कोठे जात आहे. अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने मैत्रिणीचा फोन आल्याचे सांगुण अर्ध्यातासात तिला भेटुन परत येतो असे सांगितले. बराचवेळ झाला तरी गिरीधर घरी परत न आल्याने आईने भाऊ काळजीत असताना वडील उत्रेश्वर गायकवाड यांनी फोन करून गिरीधर चा खून झाल्याची माहीती निखील व त्याच्या आईला दिली.
गिरीधरचा खुन झाल्याचे समजताच निखील आणि त्याच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गिरीधर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या घटनेची माहीती हडपसर पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसानी केलेल्या प्राथमिक तपासात गिरीधरचा खून एका मुलीने व तरुणांनी केल्याचे समजले. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाचा खून झाल्याचे समजताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नसुन हडपसर पोलीस तपास करीत आहेत.