तपसे चिंचोली येथे खरीपपूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

तपसे चिंचोली येथे खरीपपूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

औसा (प्रतिनिधी) : कृषि विभागामार्फत खरीप हंगामपूर्व प्रशक्षिण कार्यक्रम दि. 24 मे रोजी औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कृषि विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून कृषि अधिकारी आर डी रेवशेट्टे, कृषि सहाय्यक आकाश सोधले, एस के तिवारी उपस्थित होते.

यावेळी कृषि अधिकारी रेवशेट्टे यांनी शेतकऱ्यांना बियाणे निवड, उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, पेरणी पध्दत, मूलस्थानी जलसंधारण, रासायनिक खतांचा वापर, जैविक व रासायनिक कीड नियंत्रण इत्यादी बाबींचे सखोल मार्गदर्शन केले.

मग्रारोहयो फळबाग, नाडेफ, शेततळे तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या निरनिराळ्या योजनाबाबत एस के तिवारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक आकाश सोधले यांनी केले.

खरीप हंगाम नियोजनाबद्दल घरचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे व बियाणावर होणारा खर्च कमी करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तपसेचिंचोली येथे घेण्यात आलेल्या कृषि विभागामार्फत घेण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षणास तपसेचिंचोली येथील शेतकरी बांधव मारुती नेटके, बालाजी शिंदे, राजेश पाटील, शिवदास स्वामी, शिव सेलूकर, बालाजी वडगावे, माधव गिरमले, गोविंद कुलकर्णी आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author