पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त एकता प्रतिष्ठान च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त एकता प्रतिष्ठान च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त लातूर येथील एकता प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 मे रोजी लातूर शहरातील शासकीय कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 31 मे रोजी सकाळी 9 वा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच ११ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान व अवयव दानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच 31 मे रोजी सायं. ५ वाजता राजीव गांधी चौक येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या सिंहासनावरील पुतळयाचे पूजन करून भव्य शोभा यात्रेची मिरवणूक निघणार असुन ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर येथे समारोप होणार आहे. या शोभा यात्रेत सोलापूर येथील प्रसिद्ध भव्य लाईट शो व DJ साऊंड शो, पारंपरिक धनगरी ढोल पथक, पारंपरिक हलगी वादन, पारंपरिक संबळ वादन , पारंपरिक वाघ्या-मुरली, अन्नदान कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक याठिकाणी रात्री भव्य आतिषबाजी ने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन एकता प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ कसपटे यांनी केले आहे.

About The Author