विलासराव देशमुख साहेबांची आठवण देखील कार्यकर्त्यांना ऊर्जा देते – मुन्ना पाटील

विलासराव देशमुख साहेबांची आठवण देखील कार्यकर्त्यांना ऊर्जा देते - मुन्ना पाटील

उदगीर (एल.पी.उगिले) : लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या आठवनी देखील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करतात, नव्या उमेदीने काम करायची ऊर्जा देतात. असे व्यक्तिमत्व साहेबांचे होते. असे विचार उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मलकापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी व्यक्त केले.

लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात होता. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आर्थिक नुकसान झाले तरी चालेल मात्र ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येता कामा नये, असा विचार करून बंद पडलेल्या प्रियदर्शिनी सहकारी साखर कारखान्याला त्यांनी चालू केले. या भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे न्याय मिळाला. उदगीरच्या विकासामध्ये देखील विलासराव देशमुख साहेबांचे मोठे योगदान आहे .असे विचार मुन्ना पाटील यांनी स्व विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

यावेळी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार ,विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना युनिट 2 चे संचालक विनोबा पाटील गुडसूरकर ,युवक काँग्रेसचे नेते विनोद सुडे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार पाटील, महिला आघाडीच्या बालिका मुळे, शिवाजीराव देवनाळे,शिवजीराव लकवाले, ज्ञानोबा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्व. विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उदगीर तालुक्यात विविध कामे हाती घेऊन त्याचे उद्घाटन करणे, यासोबतच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोक प्रबोधनाच्या दृष्टीने हाती घेतलेल्या या कामाबद्दल जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author