अस्थमा आणि मानसिक आरोग्य या विषयावर मातृभूमी नर्सिंग स्कूल मध्ये मार्गदर्शन

अस्थमा आणि मानसिक आरोग्य या विषयावर मातृभूमी नर्सिंग स्कूल मध्ये मार्गदर्शन

उदगीर (प्रतिनिधी) : धुळीमुळे होणारा अस्थमा आणि मानसिक आजार या विषयावर मातृभूमी नर्सिंग स्कूल मध्ये ता.२७ शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात आले . आजादी का अमृत महोत्सव निमित्य “हमारा आयुष, हमारा स्वास्थ्य” अभियान अंतर्गत धन्वंतरी महाविद्यालय यांच्यावतिने आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे . मातृभूमी नर्सिंग स्कूल आणि कस्तुरबाई नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्याना डॉ. रविकांत पाटील यांनी अस्थमा आजाराची कारणे आणि लक्षणे या बाबत मार्गदर्शन केले .
धुळी मुळे शिंक येणे सामान्य गोष्ट परंतु सातत्याने धुळीत शिंका येणे ही अस्थमाची सुरुवात असू शकते .अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ पाटील यांनी सांगितले .
भिती वाटणे आणि मानसिक आजार यातील फरक या बाबत डॉ मयुरी ठाकूर यांनी मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले . वारंवार हात धुणे हे मानसिक आजाराची सुरुवात असू शकते, मात्र शिक्षक काय प्रश्न विचारतील , आपली मुलाखात चांगली होईल का? या प्रकारची भीती ही सामान्य बाब आहे असे सांगितले .
यावेळी भगत श्रद्धा , चौधरी अमृता , पूजा खरात , राठोड आकाश , नंदकुमार बयास यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author