संघटन बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – दिलीपराव देशमुख

संघटन बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - दिलीपराव देशमुख

उदगीर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षबांधणीसाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे घराघरांमध्ये आणि घरातल्या प्रत्येकाच्या मना मनामध्ये पोहोचवावी. असे विचार माजी राज्यमंत्री दीलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले.

ते इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटी च्या वतीने उदगीर येथील सहशिक्षिका तथा कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष बालिका मुळे यांची निवड प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष महिला मोर्चा म्हणून करण्यात आल्याचे पत्र बालिका मुळे यांना दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

सदरील नियुक्ती पत्रांमध्ये बालिका मुळे यांनी आज पर्यंत पक्ष संघटन बांधण्यासाठी पक्षाचे उद्देश ,ध्येयधोरणे, निष्ठा राखून जनसामान्यांमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत इंडियन काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमिटीच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, श्री राहुल जी गांधी यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्या सक्रियपणे करतील. या हेतूने सदरील निवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटी चे संस्थापक विपिन सिंह राजावत यांनी सदरील पत्र दिले आहे.
श्रीमती बालिका मुळे यांची निवड प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र या मोठ्या पदावर झाल्यामुळे उदगीर शहरातील सर्व शिक्षक संघटना ,काँग्रेस आघाडीतील कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. बालिका मुळे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले की, पक्षाने माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिली आहे. सदरील जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जिवाचे रान करू काँग्रेस पक्षातील सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सक्रियपणे सहभाग नोंदवून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच पक्षश्रेष्ठींचा आदेश आपल्यासाठी प्रमाण मानून आपण काम करू. असे आश्वासन दिले. याप्रसंगी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author