शिवाजीराव सिरसाट यांच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती

शिवाजीराव सिरसाट यांच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती

ना. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या जबाबदारीचे केले सार्थक

शिवाजीराव बन्सीधर अण्णा सिरसाट हे ग्रामीण भागातून आलेले युवा नेतृत्व… समाजसेवेचे आणि जनसामान्यांसाठी काम करण्याचे बाळकडू त्यांचे वडील आणि जेष्ठ नेते बन्सीधर अण्णा सिरसाट यांच्याकडूनच मिळालेले. अगदी बालपणापासून सार्वजनिक जीवन जवळुन बघितल्याने राजकारणाचे धडे घेण्याची त्यांना गरजच भासली नाही. माशाच्या पिलाला पोहणे शिकवण्याची गरज नसते त्याप्रमाणेच शिवाजीराव सिरसाट यांना समाजसेवा शिकवण्याची गरज पडली नाही.
शिवाजीराव सिरसाट यांनी अगदी आपल्या शालेय जिवनापासुनच सामाजिक कार्य सुरू केले. वडील बन्सीधर अण्णा सिरसाट यांचा राजकारणात चांगलाच दबदबा असल्याने गावातीलच नव्हे तर परिसरातील नागरिक लहान मोठ्या कामासाठी त्यांच्याकडे येत असत. अगदी तळागाळातील माणसाच्याही कामाला ते कधी नाही म्हणत नसत. हाच वारसा घेऊन शिवाजीराव सिरसाट यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. शिवाजी सिरसाट मितभाषी असले तरी प्रत्येकाची अडचण समजून घेऊन त्याला मदत करण्याची त्यांची हातोटी. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला माणूस नाराज होऊन गेला असे कधी झाले नाही.
फक्त गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील कुणाचीही अडचण असो काळ वेळ न पाहता मदतीला धावून येणारा माणूस म्हणजे शिवाजीराव सिरसाट अशी परिसरात ओळख. घाटनांदुर या तालुक्यासमान समान गावात शेतकरी, शेतमजूर आणि नागरीकांशी त्यांचा थेट नाळ जोडली असल्याने, कुणाला पैसे कमी पडले, कुणाला दवाखान्यात मदतीची गरज वाटली तर लोक हक्काने त्यांच्याकडे येणारच… आणि शिवाजी सिरसाटही त्यांना मदत करणारच हे गणित ठरलेलेच….
शिवाजीराव सिरसाट यांच्या लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या वृत्तीमुळेच ते तब्बल चार वेळा गावचे बिनविरोध सरपंच झाले. सरपंच असताना त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी शिवाजीराव सिरसाट यांच्या पत्नी सौ.शिवकन्या सिरसाट यांना अगोदर जिल्हा परिषदेचे तिकीट दिले आणि कार्याची क्षमता पाहुन जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यामुळे सिरसाट दांपत्याच्या कार्याला खरी गती मिळाली. दोघांनी मिळून जिल्ह्याच्या अगदी वाडी तांड्यावर विकास गंगा पोंहचविली. शिवाजीराव सिरसाट यांनी धनंजय मुंडे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी शिवाजीराव यांनी जिवाचे रान केले आणि आपल्या कामाची छाप पाडली. शिवाजीराव सिरसाट हे ग्रामीण भागातून आलेले आणि आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केलेले नेतृत्व आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वर चरणी प्रार्थना.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!