महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ बब्रुवान मोरे हे होते तर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश ससाणे व भूगोल विभागाचे डॉ. सचिन गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन.एस. एस. स्वयंसेवक राम पाटील यांनी केले तर आभार प्रीतम काळे यांनी मांडले मानले. या यावेळी अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापुरे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
