स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९वी जयंती शहरात उत्साहात साजरी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९वी जयंती शहरात उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तब्बल सत्तावीस वर्षे शिक्षा भोगलेले क्रांतिकारकांचे मुकुटमणी, थोर समाजसुधारक, कवी, लेखक, नाटककार, शाहिर, अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले ओजस्वी वक्ते, राजकीय हिंदुत्वाचे जनक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. डाॕ. भूषणकुमार जोरगुलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व स्वा.सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच जीवक आरोग्य मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजप नेते अॕड.भारतभाऊ चामे, डाॕ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, श्री. अमित रेड्डी यांच्यासह डाॕ. मेजर मधुसूदन चेरेकर, कॕप्टन माधव शिरसाट, रा.स्व.संघाचे देवेंद्र देवणीकर, राष्ट्र सेवा दलाचे राजेसाहेब पौळ, माधव भगत, बजरंग दलाचे श्री.पांडुरंग लोकरे, गुरुनाथ शेटकार, महादेव शिवणगे, मकरंद जोशी, नागनाथ कदम, केशव राजाराम मुंडकर, उमाकांत भुरे, अभय निलंगेकर, महेश मुळजकर, बापूराव शिरुरकर, देवीप्रसाद मांडणीकर आदिंची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!