बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग

बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग

पिंपरी (रफिक शेख) : शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून प्रेमसंबंधांसाठी व्हॉट्सअॅपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दिघी रोड भोसरी येथे २० मार्च ते २६ मे या कालावधीत ही घटना घडली. पीडित महिलेने या प्रकरणी शुक्रवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अभिलाश राऊत (वय २९, रा. अमरावती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला नको असतानाही आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्याची. मागणी केली. आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅपवर फिर्यादी महिलेची बदनामी करणारे स्टेटस ठेवून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे तपास करीत आहेत.

About The Author