पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलाला मारहाण
पिंपरी (प्रकाश इगवे) : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलाला मारहाण केली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पतीला अटक केली. केशवनगर, नेवाळेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. शंकर चिमणराव नेवाळे (वय ३७, रा. केशवनगर, नेवाळे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर नेवाळे आणि फिर्यादी महिला हे पती-पत्नी आहेत. आरोपी हा वेळोवेळी फिर्यादी महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने महिलेने त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार केली. आहे. मुलाने चारचाकी गाडी का घेतली? तसेच फिर्यादी महिलेने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या राग मनात धरून आरोपीने मुलाला मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेच्या घराच्या हॉलच्या व मुलाच्या बेडरूमच्या काचा व जाळी तोडली. आरोपीने दगड फेकून मारला.