तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाताय…? तोंडात चट्टा आलाय? … वेळ दवडू नका… 31 मे ला तपासून घ्या..!!

तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाताय...? तोंडात चट्टा आलाय? ... वेळ दवडू नका... 31 मे ला तपासून घ्या..!!

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात दि. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुख कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक यांनी खालील लक्षणे असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात आपली मौखिक तपासणी करून घेण्यात यावे. असे आवाहन अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी केले आहे.

याची लक्षणे पुढील प्रमाणे
1)तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या तोंडामध्ये पांढरा किंवा लाल चट्टा असणे
2)तोंड कमी उघडता येणे व तोंडाची त्वचा जाडसर होणे
3)तोंडाची जळजळ होणे व तिखट न लागू देणे
4) पंधरा दिवसांपेक्षा जास्त असणारी तोंडाची न भरून येणारी जखम असणे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे ब्रीद वाक्य “Tobacco threat to our environment ” “तंबाखूजन्य पदार्थामुळे आपणास व पर्यावरणास धोका” असे आहे. त्यामुळे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊ किंवा ओढू नका.. आरोग्याबरोबर निसर्गाची हानी टाळू या.. यासाठी ही मोहिम आखली आहे. तपासून घ्या आणि आरोग्यपूर्ण रहा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!