देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी दिली नागरिकांना सूचना
देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागरिकांना सूचना आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिक घराला लॉक /कुलूप लावून घराच्या स्लॅबवर/ गच्चीवर झोपत असतात. यामुळे अज्ञात चोरट्याना चोरीची संधी मिळत आहे. तरी अज्ञात चोरटे घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात देखील चोरीच्या प्रमाणात खुप वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सूचना आहे घरातील सर्व व्यक्ती बाहेर किंवा स्लॅबवर/ गच्चीवर झोपण्यापेक्षा काही व्यक्ती घरामध्ये आतमधुन कडी लावून झोपावे. घरामध्ये जास्त मौल्यवान दागिने पैसे ठेऊ नये. पैसे बँकेत ठेवावे. तसेच गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे. व नागरिकांनी गावामध्ये रात्रीच्या वेळी नियमितपणे एकत्र मिळून आळीपाळीने गस्त ठेवावी. सर्व डॉक्टर्स व रुग्णालये यांना कळविण्यात येते की,त्यांनी अनोळखी व्यक्तीकडून येणारे काॕल स्विकारू नये तसेच त्यांना उपचाराचा बहाणा करून आँनलाईन पेमेंट करतो असे सांगणाऱ्या पासून सावध रहावे,सध्या बऱ्याच डॉक्टराची आर्मी बीएसएफ सीआरपीएफ चे जवान बोलत आहोत व आम्हाला उपचारासाठी अॕडव्हान्स पेमेंट करावयाचे आहे असे सांगून फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे तरी सर्व डॉक्टर व रुग्णालये यांनी खबरदारी घ्यावी,अशी सूचना पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी देवणी तालुक्यातील नागरिकांना दिली आहे.
