भानुदास शिंगडे यांचे दुःखद निधन
अहमदपूर : दि.29.05. 22 तालुक्यातील अंधोरी येथील प्रगतिशील शेतकरी भानुदास संतराम शिंगडे यांचे दि. 28 रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन. दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता अंधोरी तालुका अहमदपूर येथील शेता मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून अहमदपूर येथील सिंगडे ज्वेलर्सचे मालक श्रीयुत विनोद शिंगडे व वनरक्षक संदीप शिंगडे यांचे ते वडील होत. त्यांच्या अकाली निधनाने बद्दल पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
