म्हाडा कॉलनीतील मंदिराचे पावित्र्य धोक्यात अवैद्य धंद्याचा विळखा जोरात

म्हाडा कॉलनीतील मंदिराचे पावित्र्य धोक्यात अवैद्य धंद्याचा विळखा जोरात

उदगीर (विशेष प्रतिनिधी) : उदगीर शहराच्या आजूबाजूला पसरलेल्या नवीन वस्तीमध्ये अवैध धंदे मोठ्या गतीने वाढू लागली आहेत. त्याला कारण काय आहे ? हे कळायला मार्ग नाही. असे असले तरीही; उदगीर शहरातील म्हाडा कॉलनी मधील मंदिराच्या आजूबाजूलाच अवैद्य धंदे चालू आहे अत्यंत चुकीचे आहे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे तसेच याच परिसरात अनेक शाळा महाविद्यालय आहेत त्या परिसरातील विद्यार्थ्यावर ही त्याचा विपरित परिणाम होत आहे याच भागात अवैध वेश्या व्यवसाय चालत असल्याची ही चर्चा आहे हे सर्व असताना देखील पोलीस मात्र हातावर हात ठेवून गप्प आहेत ही परिस्थिती कधी बदलेल त्याची जनता वाट पाहत आहे, म्हाडा कॉलनीतील अवैध धंदे आणि वेश्याव्यवसाय याला प्रतिबंध घातला जावा अशी मागणी केली जात आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने शरीर व्यवसायाला जरी परवानगी दिली असली तरआ स्वच्छेने हा शब्द महत्त्वाचा आहे या ठिकाणी कित्येक अल्पवयीन मुली देखील नाईलाजास्तव या व्यवसायात ओढल्या गेले असल्याची चर्चा आहे याचीही शहानिशा होणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे तसेच आय टी आय कॉलेजच्या पाठीमागील बाजूस देखील अवैद्य धंदे चालू आहेत अशीही चर्चा जनतेमध्ये चालू आहे यासोबतच ,कौलखेड रोड या भागात पत्र्याच्या शेडमध्ये अवैद्य धंदे मोठ्या गतीने वाढत आहेत. याला काही ठिकाणी स्थानिक च्या सटरफटर लोकप्रतिनिधी म्हणऊन घेणाऱ्या कार्यकर्त्यांचाही पाठिंबा असल्याचे बोलले जाते.

कारण अशाच एका स्वतःला नेता समजणाऱ्या कार्यकर्त्यांनी पूर्वी फुलेनगर भागातील महिलांचा मोर्चा उदगीर शहर पोलीस स्टेशनवर आणला होता. त्यानंतर त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी थोडासा मान देताच आणि कारवाईचे आश्वासन देताच,तो कार्यकर्ता आणि त्याचे साथीदार लगेच परत निघाले. एकंदर काय तर काही कार्यकर्ते विविध कार्यालय मधून आपल्याला प्रतिष्ठा मिळावी,कांहीं हाताला लागावे अशी भावना ठेवून शहरात वाढत असलेल्या अवैध धंद्याला एक तर चालना देणे, नाहीतर त्याला विरोध करणे. असे प्रकार चालू करत आहेत. मात्र या सर्व प्रकारांमध्ये समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे.

कांहीं ठिकाणीं अवहेलना तर काही लोकांची करमणूक होत आहे. असे असले तरीही अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी .अशी रास्त अपेक्षा जनसामान्यात ऊन व्यक्त केली जात आहे.मात्र स्थानिक पोलीस आपले हित संबंध टिकून ठेवन्या साठी गप्प असल्याचे बोलले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!