हरभरा खरेदीला १८ जूनपर्यंत मुदतवाढ नागनाथ बोडके यांच्या प्रयत्नांना यश
उदगीर (प्रतिनिधी) : नाफेड अंतर्गत शेतकर्यांच्या हरभरा खरेदीसाठी १८ जून २०२२
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीचे पत्र केंद्र सरकारने जारी
केले. शेतकर्यांच्या हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नागनाथ बोडके यांनी
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर
यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला होता.
नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी करण्यात येत होती. शासनाच्या ठराविक
नियमाप्रमाणे दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी च्या पत्राद्वारे सहा लाख 89 हजार 215 मेट्रिक टन उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते त्या अनुषंगाने एक मार्च 2022 रोजी प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली दिनांक 29 मे २०२२ पर्यंत तीन लाख 69 हजार 969 शेतकऱ्याकडून 69 लाख 13 हजार 535.45 हरभरा खरेदी करण्यात आला मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा हरभरा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला होता त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नागनाथ बोडके यांनी सतत पाठपुरावा करून शासनाला उद्दिष्ट वाढ आणि देणे तारीख वाढ देणे यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता आगाऊ खरेदी करण्याचे आवाहन केले होते.
परंतु अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे ता. २३ मे पासून हरभरा खरेदी
बंद होती. त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य जिल्ह्यामध्ये लाखो
क्विंटल हरभरा शेतकर्यांकडे पडून होता. शेतकर्यांचे नुकसान लक्षात घेता
अनेक शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी यांनी नागनाथ बोडके यांची
भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन देत नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ
देण्यात यावी, या अनुषंगाने मागणी केली होती. हरभरा उत्पादक शेतकर्यांचे
हित लक्षात घेता, नागनाथ बोडके यांनी यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकड पत्रव्यवहार केला होता. यामुळे नाफेडकडून करण्यात येणार्या हरभरा
खरेदीला १८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो शेतकर्यांच्या
हिताचा आणि हरभरा उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा हा निर्णय नागनाथ बोडके यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागला आहे.
