वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापुर शहर पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापुर शहर पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त हरिष बैजल हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अवघ्या ७ महिन्यांच्या कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे. सोलापुर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त निवृत्त होत असताना त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा सुरु असतानाच आज ( सोमवार) आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल आहे.पोलीस आयुक्त सेवानिवृत्ती होत असताना. दुसरीकडे शहराला नविन कोणता अधिकारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. वेगवेगळ्या चर्चांमधुन अनेकांची नावे पुढे येत होती. मात्र सोमवारी अचानक आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापुर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात येणार असल्याच सांगण्यात आल आहे.सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक म्हणुन ते कार्यरत आहेत.मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिष बैजल यांच्याकडून पदभार घेऊन अतरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत. दरम्यान आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापुर आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार हा तात्पुरत्या कालावधीसाठी राहणार असल्याचं सध्यातरी सांगण्यात आल आहे.

About The Author

error: Content is protected !!