महात्मा फुले महाविद्यालयात आज हिंदी विषयाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालय महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर जीवन और कार्य ‘या विषयावर एक दिवशीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय ई -चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे असून किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच या चर्चासत्राचे उद्घाटन नेपाळ येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक त्रिभुवन विद्यापीठ, कीर्तीपुरचे प्रो.डॉ.विनोद कुमार विश्वकर्मा ‘ विमल ‘ हे करणार आहेत. यावेळी बीजभाषक म्हणून प्रो. डॉ. पंडित बन्ने , सोलापूर प्रमुख मार्गदर्शक डॉ.बाळासाहेब कामन्ना , पट्टणकडोली यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या चर्चासत्राच्या शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्ष प्रो. डॉ. मुरलीधर लहाडे, बनसारोळा हे असून या सत्रात डॉ.सुमा टी. रोडनवार (कर्नाटक ), डॉ.नुपूर देशावर, जबलपूर (मध्यप्रदेश) डॉ. अमर आलदे, चौसाळा, महाराष्ट्र हे प्रातिनिधिक स्वरूपात शोधनिबंधाचे वाचन करणार आहे. या आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्रात आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचे अवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व संयोजक डॉ पांडुरंग चिलगर, सहसंयोजक प्रो. डॉ. नागराज मुळे यांनी केले आहे.
