विविध विकास कामाचे ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते आज उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील विविध विकास कामाच्या उद्घाटनाचा समारंभ उदगीर चे आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे . या विकास कामांमध्ये प्राधान्याने उदगीर नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीमधून उदगीर शहरातील महात्मा गांधी गार्डन विकसित करणे, व जिजामाता भाजी मंडई येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करावयाच्या कामाचे भूमिपूजन समारंभ राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर नगर परिषदेचे प्रशासन तथा उदगीर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. तरी सदरील महात्मा गांधी गार्डन विकसित करण्याच्या कामी आणि जिजामाता भाजी मंडई येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करावयाच्या कामाचे भूमिपूजन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन उदगीर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
