रामेश्वर सब्बनवाड याचे यूपीएससी परीक्षेत यश; शिरूर ताजबंद येथे सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील रामेश्वर सब्बनवाड हा विद्यार्थी देशात 202 व्या क्रमांकावर यशस्वी झाला आहे. या यशाबद्दल अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे मलफेदवार परिवाराच्या वतीने एस एम परफेक्ट मेन्स वेअर येथे सबनवाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील किराणा दुकानदार सुधाकर सब्बनवाड यांचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड यांनी यूपीएससी परीक्षेत 202 वा क्रमांक संपादन करत यश संपादन केले आहे. जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश मिळू शकते हे सिद्ध होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली . रामेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण हंडरगुळी च्या रामराव पाटील प्राथमिक विद्यालय झाले त्यांचे बारावीचे शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात झाले त्यानंतर त्यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी मिळाली पुणे येथे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुठलीही क्लास न लावता यूपीएससीचा अभ्यास केला व दुसऱ्या वेळेस त्यांना उज्वल यश मिळाले आहे . हंडरगुळी गावचे पहिली आयएएस अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला असून बाब समजताच हंडरगुळी येथे जल्लोष करण्यात आला व रामेश्वर यांच्या वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला या यशाबद्दल अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील गोविंदराव मलफेदवार यांचे रामेश्वर सबनवाड हे भाचे असल्यामुळे मलफेदवार परिवाराच्या वतीने एस एम परफेक्ट मेन्स वेअर येथे सबनवाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला या सत्काराला ग्रामपंचायत सदस्य सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शिरूर ताजबंद येथील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
