अहमदपूर शहरातील मोंढा रोड येथील पोकरणा यांच्या घरी ३ लाख ३८ हजारांची घरफोडी

अहमदपूर शहरातील मोंढा रोड येथील पोकरणा यांच्या घरी ३ लाख ३८ हजारांची घरफोडी

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील किराणा मालाचे व्यापारी प्रमोद प्रकाश पोकरणा यांच्या मोंढा रोड येथील घरी अज्ञात चोरट्यांनी दि ९ डिसें रोजी घरफोडी केली असुन सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे तब्बल चार दिवसांनी दि १३ डिसें रोजी अज्ञात आरोपी विरूध्द अहमदपूर पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी कि, दि ८ डिसें रोजी रात्री ८:०० वाजता आम्ही घरातील सर्वजन बाहेरगावी निघालो असता घाई गरबडी मध्ये माझा भाऊ शुभम पोकरणा याने घराच्या दरवाजाला कुलुप लावण्यास विसरला व आम्ही सगळे कुटुंबासह पुणे येथे लग्नासाठी गेलो लग्न समारंभ पुर्ण करून आम्ही परत दि १o डिसें रोजी सकाळी ७:३० वाजता कुटुंबासह परत आलो त्यावेळी घराचे मुख्य दार पुढे ओढुन कुलुप आढळले होते आम्ही दार काढुन आत गेलो असता घरातील कपाटामधील सामान फेकलेले अस्थवस्थ दिसले व आम्ही कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याच्या प्रत्येकी दिड तोळ्याच्या दोन बांगड्या किं अंदाजे १ लाख २o हजार व दोन चांदीच्या देवाच्या मुर्त्या २८ तोळे वजनाच्या अंदाजे किं १८ हजार ६oo रू तसेच दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र किं अंदाजे १ लाख रू रोख रक्कम १ लाख रू असा एकुण ३ लाख ३८ हजार ६oo रू कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून घेऊन गेले आहे आम्ही आमच्या घरातील लावलेली सिसि टिव्ही फुटेज पाहीले असता सदरची चोरी हि दि ९ डिसें रोजी मध्यरात्री १.३० ते २:०० च्या दरम्यान झाल्याचे दिसुन आल्याची फिर्याद प्रमोद पोकरणा यांनी दिली असुन अज्ञात आरोपी विरुद्ध तब्बल चार दिवसांनी अहमदपूर पोलीसात भारतीय दंड संहिता १८६o कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ सुहाश बेंबडे हे करीत आहेत.

About The Author