लाईटच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त; लोकप्रतिनिधी व प्रशासनाच दुर्लक्ष

लाईटच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त; लोकप्रतिनिधी व प्रशासनाच दुर्लक्ष

कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : या परिसरातील शेतकरी लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे हा त्रास सोसावा लागत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे यामुळे या परिसरातील शेतकरी लोकप्रतिनिधी व प्रशासनावर नाराजगी व्यक्त करत
असल्याचे दिसून येत आहेत.

यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊसने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी राजा मोठ्या आनंदाने शेतातील कामे पूर्ण करून पेरणी केले होते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊन हाताशी आलेला पिक उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी, हे सर्व पिके जमीनदोस्त होऊन पाण्यासकट वाहून गेले. असे झाल्याने शेतकरी पूर्णतः आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.
यावर्षी मुसळधार पाऊस पडल्याने वडे, नाले, विहिरी तुडुंब भरले आहेत त्या पाण्याचा फायदा घ्यावा म्हणून शेतकरी पून्हा रब्बी पीक घ्यावे या अपेक्षेने शेतामध्ये काबाडकष्ट करण्यास सुरुवात केले. वरील सर्व पिके जमीनदोस्त झाल्याने त्या जमिनीमध्ये हरभरा, ज्वारी, गहू, मका, शेंगा, असे अन्य पिकांची लागवड करून यात निघणाऱ्या उत्पन्नावरच संपूर्ण कुटुंबाचा वार्षिक उपजिविका पूर्ण होईल या आशेने बळीराजा आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करीत आहे.

या रब्बी हंगामाला लगन्याचे दोन मुख्य गोष्टी असतात एक पाणी, आणि दुसरा लाईट यावर्षी मुसळधार पाऊस पडल्या कारणाने पाण्याची कमतरता नाही लाईट मात्र शेतकऱ्या सोबत लपंडाव खेळत असल्याचे दिसून येत आहे यासाठी महावितरण कंपनीकडून शिफ्ट पाडून दिलेले असताना देखील त्या शिफ्ट मध्ये पूर्णतः लाईट मिळत नाही अक्षरशः एक शिफ्ट रात्री आकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत असे असताना देखील शेतकरी राजा काळोख अंधारात अतिशय थंड गारव्यात अशा परिस्थितीत आपल्या शेतामध्ये लाईट ची वाट पाहात रातोरात जागत असल्याचा दिसून येत आहे. यावेळीसुद्धा लाईटचा लपंडाव हा चालूच असल्याने या परिसरातील शेतकरी लोकप्रतिनिधी व प्रशासनावर नाराजगी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोय कडे पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वेळ नाही पण शेतकऱ्याचा कळवला दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक नेते मंडळीकडून होत आहे असे बोलले जात आहे. किमान दिवसा पाच तास सतत वीज मिळावा यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करावे असे विनंती शेतकऱ्या कडून केली जात आहे.

About The Author