कृषी कायद्यामुळे शेतकरी व उद्योजकाचा फायदा होणार आहे – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषीप्रधान देश म्हणून जगात प्रसिध्द आहे. तरीही सर्वाधिक अडचणीत असणारा उद्योग आहे. त्याचे मुख्य कारण अधिक उत्पन्न देणारे व देशात, जगात मागणी असणारी पीके आम्ही काढत नाही. त्याचे कारण माहितीचा अभाव व आर्थिक अडचण त्यामुळे नवीन करण्याची क्षमता राहत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने नवीन कृषी कायदा केला. त्या कॉन्ट्रक्ट फार्मिंगमुळे कंपनी अथवा उद्योजक पैसे लावून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढू शकेल. त्यामुळे शेतकर्याचा व कंपनीचा दोघाचाही फायदा होऊन देशासमोरील शेतकरी आत्महत्यांची आपत्ती दुर होईल, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कव्हा येथे आत्मनिर्भर शेतकरी अभियान कार्यक्रमांअतर्गत सुभाषअप्पा सुलगुडले यांच्या शेतात शतावरी औषधी पीक काढणी उपक्रमात बोलत होते.
यावेळी कृषी उपसंचालक राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर, सुर्यकांतराव शेळके, एस.आर.मोरे, डॉ.अरविंद भातांबे्र, प्रा.गोविंदराव घार, कव्हा सोसायटीचे चेअरमन सुदाम रूकमे,भागवत घार, उपसरपंच किशोर घार, मुच्छिंद्र मुंढे, शरणप्पा अंबुलगे, लायक पाशा पठाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, देशामध्ये 82 टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. त्यामुळे नवीन कृषी कायद्यामुळे उद्योजक कंपनी अधिक उत्पादन देणार्या बियाण्याचा शोध लावण्यासाठी पैसे टाकून संशोधन करेल. त्यामुळे अधिक उत्पादन देणारे बियाने निघतील अमेरिकेत सोयाबीन 50 क्विंटल एकरी उत्पादन आहे. ब्राझीलमध्ये ऊसाचे उत्पन्न आपल्यापेक्षा 3 पट आहे. त्यांनी सुधारीत बियाणे काढलेले आहे. त्यामुळे कृषी काद्यामध्ये राजकारण न आणता शेतकरी व देशाच्या हितासाठी त्याला सर्वांनी पाठींबा द्यावा, असे आवाहन माजी आ.कव्हेकर यांनी केले.
