संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
अहमदपूर (गोविंद काळे) : रोजी येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदयकुमार जोशी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.दत्ता गलाले, राज्य आदर्श शिक्षक बालाजी तुरेवाले, दिपक हिंगणे, राज्य साधन व्यक्ती शिवानंद उंदीरकल्ले, जिलानी शेख, संतोष कदम सह शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मीना तोवर सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
