पैशावरून कार्यकर्त्यांच्या कामाचे मोजमाप होणे लोकशाहीला घातक..!
अहमदपूर (गोविंद काळे) : चळवळीत काम करत असताना त्याच्या कार्याकडे न पहाता त्या कार्यकर्त्याची आर्थीक परिस्थीती कशी आहे यावरच त्याचे मोजमाप होत असल्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात वाढत असल्याचे गंभीर चित्र आपल्याला पहायला मिळत आहे.ही बाब लोकशाहीला घातक आहे असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. मातंग शक्तीचे तालूकाध्यक्ष युवक कार्यकर्ते मूकूंद वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत सत्कार सोहळ्यात ते प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार बब्रूवान खंदाडे,कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख, साजीदभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष सय्यद साजीदभाई,ज्ञानोबा बडगीरे,राज्यप्रवक्ते प्रा.दयानंद कांबळे, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुलभाऊ मोठे,जिल्हा सचिव संतराम मोठेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,कार्यकर्ता हा सामाजिक क्षेत्रात आपले काय योगदान देतो हे पाहीले पाहीजे किंबहूना जनतेच्या प्रती समर्पीत भावनेने काम करत असताना लोकांच्या उपयोगी पडतो का..?सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची शासनदरबारी पाठपूरावा करण्याची त्याच्यात धमक आहे का..? या सर्व बाबींचा सूध्दा विचार होणे गरजेचे आहे तरच खऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाला न्याय मिळू शकेल.
सूरूवातीला सकाळी सर्व महापूरूषांच्था स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.दूपारी रक्तदान शिबीर,स्मशानभूमीत वृक्षारोपण,क्रिकेट स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले.त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा केला.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी बब्रूवानजी खंदाडे,सय्यद साजीदभाई, प्रा. कांबळेसर आदींची समायोचीत भाषणे झाली. सूत्रसंचालन शिक्षक नेते गिरीषभाऊ गोन्टे यांनी केले तर आभार तिरूपती वाघमारे यांनी मानले.
