विश्व वारकरी संघाच्या जिल्हाअध्यक्ष पदी कृष्णा महाराज कुलकर्णी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याच्या विश्व वारकरी संघाच्या जिल्हाअध्यक्ष पदी लातूरचे वारकरी संप्रदायातील युवा मृदंग वादक, गायक, किर्तनकार म्हणून ज्यांनी अगदी कमी वयात आपली ओळख निर्माण केली असे ह.भ.प.कृष्णा महाराज कुलकर्णी यांची ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूरकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येत आहे असे मत विश्व वारकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख यांनी म्हटले आहे. कृष्णा महाराज यांच्या निवडीबद्दल संपूर्ण स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.
