विद्यापीठ खेळाडू ऐश्वर्या कौटकर, दिव्या ठाकूर यांचा सत्कार

विद्यापीठ खेळाडू ऐश्वर्या कौटकर, दिव्या ठाकूर यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉलपटू ऐश्वर्या कौटकर व दिव्या प्रतापसिंह ठाकूर यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संघात निवड झाली. त्यांनी विद्यापीठ संघात स्थान मिळवून आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने प्रत्येकी दीड हजार रूपयांचे पारितोषिक/शिष्यवृत्ती/प्रोत्साहन बक्षिस व स्मृतीचिन्ह देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड , युवा नेते निखील गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक डॉ. अशोक वाघमारे, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, प्रा. रविकिरण गळगे, आदी उपस्थित होते.

दयानंद शिक्षण संस्थेने आम्हा खेळाडूना सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल दोन्ही खेळाडूंनी दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष ललितभाई शहा, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड आदींचे आभार व्यक्त केले व यापूढे अधिक चांगली कामगिरी करू असा आत्मविश्वास व्यक्त केला.

About The Author

error: Content is protected !!