विविध कार्यकारी सोसायटी नवनिर्वाचित संचालकांचा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे बोथी ता.चाकूर आणि कोपरा ता. अहमदपूर येथील नवनिर्वाचित निवडून आलेल्या विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालकांनी नुकतीच आमदार बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी बांधवांसाठी क्रांतिकारी निर्णय घेत नेहमी सहकार्य करण्याची सदिच्छा व्यक्त केली.
बोथी विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालकपदी रामेश्वर वैजनाथआप्पा अक्कानारू, सूर्यकांत मारुती डिगोळे, बालासाहेब केशवराव पाटील, काशिनाथ शामराव केंद्रे, आप्पाराव मोरगे, सुभाष भिमराव हाके, सूर्यकांत बळीराम केंद्रे, राजेश्वर बापूराव महात्मे, शिवराज गणपलीआप्पा आवाळे, प्रमेश्वर आण्णाराव नवहान यांची निवड झाली आहे. प्रसंगी गंगाधर आप्पा अक्कानारू, अनिलराव वाडकर, गणपत निथळे महाराज, अमोल मुकिंद काळे, अशोक विठ्ठल केंद्रे, तिडके साहेब, नागनाथ आवाळे, संदीप शेटे, अंकुश बोमदरे, भागवत माळी आदी उपस्थित होते. कोपरा विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी उत्तम वामनराव सूर्यवंशी, संतोष शिवदास कंदे, सचिन विठ्ठलराव पाटील, बालाजी रंगनाथ देपे, साहेब विठ्ठलराव गोरे, सुरेश व्यंकटी देपे, नारायण पलमटे, उत्तम बने, सुभाष पलमटे, श्रीधर बनसोडे, इंद्रजीत सोपान देपे, महादू एकनाथ बेदपे यांची निवड झाली आहे. प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
