संपादक राजीव किनीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न
उदगीर : सामाजिक शैक्षणिक राजकिय क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांच्या जिवनाला नव्यादिशा देऊन त्यांच्या जिवनात नवचैतन्य निर्माण करणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्याने लिखाण करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारेआणि विविध पुरुषांच्या विचाराचे देवाण घेवाण करून नवीन नवीन संकल्प करून नव्यादिशा वृत्तपत्राच्या माध्यमातून उंच भरारी घेणारे व शून्यातून विश्व निर्माण करू पाहणारे एक झुंजार व्यक्तिमत्त्व नव्यादिशा चे संपादक राजीव किणीकर यांचा वाढदिवस अधिकारी व कर्मचारी देवणी व उदगीर येथील पत्रकाराच्या वतीने उदगीर येथे साजरा करण्यात आला मूर्ती लहान व कीर्ती महान असं व्यक्तिमत्त्व असलं तरी अगदी स्पष्ट बोलणं मित भाषी आपल्या तील असलेलं संघटन कौशल्य यांच्या जोरावर उदगीर सारख्या शहरात एक आगळ वेगळं अस्तिस्तव निर्माण करण्याचे काम राजीव किणीकर यांनी केले आहे सडेतोड स्पष्ट बोलणारे असले तरी मवाळ दयाळू वृत्तीचे आहेत त्यामुळे सर्वांना हवेहवे से वाटतात त्यामुळे त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उदगीर चे
नायब तहसीलदार खरात , ग्रामविकास अधिकारी एस.आर कांबळे, शाखा व्यवस्थापक आनंद गोटमुकले,पो. काॅ.मोतीपवळे , दै.प्रतिव्यवहार चे उदगीर तालुका प्रतिनिधी मनोहर लोहारे, प्रतिजंग चे संपादक पत्रकार महेश मठपती,शालेय संकल्प वृत्तपत्राचे जेष्ठ संपादक शंकर बोईनवाड, अमरज्योत चे संपादक प्रा नरशिग सूर्यवंशी , लोकवैभव चे संपादक गिरीधर गायकवाड नागराळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शुभम बुमने ,युवा कार्यकर्ते अविनाश सुर्यवंशी, ऍग्रो इंडिया चे, संपादक टाळीकोटे , पत्रकार अनिल जाधव, पत्रकार नागनाथ गुट्टे , पत्रकार बस्वराज डावळे ,पत्रकार अरविंद पत्की , तानाजी फुले , बाबुराव आंबेगावे , पुंडलिक कांबळे , समर्थ गायकवाड यांच्या सह आनेक मान्यवर उपस्थित होते.
