कासार सिरसीत शिवसेनेचा जागर मेळावा संपन्न
कासार सिरसी (बालाजी मिलगिर) : कासार सिरसी ता. निलंगा येथे दि,4/6/2022 रोजी सायंकाळी शिवसेनेचा जाहीर जागर मेळावा सपन्न झाला.
भारतीय जनता पार्टीचे नेते काम कमी प्रसिद्धी व श्रेय मिळविण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत भारतीय जनता पार्टीचे स्थनिक नेते जनतेसी खोटे बोलून दिशाभूल करत आहेत असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी येथे होत असलेल्या शिवसेनेचा जनसंपर्क जाहीर मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार संतोष साबरे, औसा मतदार संघासाठी उभरते नेतृत्व बजरंगदादा जाधव, जिल्हाप्रमुख शिवाजी माने, संतोष सोमवंशी, महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख जयश्रीताई उडगे, विनोदअण्णा आर्य, अविनाश रेशमे,किरण कानडे, मयूर गबुरे, डाँ,सुधीर कानाडे,जगन जगदाळे आजर सावकार,बालाजी माने,देवानंद मुळे, खंडू काकडे,आनंद गवळी, जुबेर फिलारी चांद नसरजग व परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
ही मेळावा लातूर जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित जनसंपर्क अभियान अंतर्गत घेण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे कासार सिरसी शाखाच्या वतीने सत्कार करण्यात आले,
जागर जनतेचा या मेळाव्याचा सांगता कासार शिरसी येथे वरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले
माजी आमदार संतोष सांबरे
यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मागील सरकार कर्जमुक्तीचा आश्वासन देऊन जनतेला फसविलेला आहे त्यानं येणाऱ्या काळात जनता धडा शिकवेल असे ही ते म्हणाले.
पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसैनिकानी कंबर कसून कामाला लागणे गरजेचे आहे यश आपल्या पुढे आहे असे आव्हान यावेळी करण्यात आले
ठाकरे सरकार हा जनतेत जाऊन काम करायचा सरकार आहे हेच वारसा पुढे आपण कायम ठेऊ असेही त्या म्हणले.
औसा मतदार सघातील शिवसैनिकांना एकत्रित करून पक्ष मजभूत करण्यासाठी शेवटच्या स्वसा पर्यंत प्रेयत्न करणार असल्याचे वचन माजी कृषी सभापती बजरंग दादा जाधव यांनी दिले.
सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मडोळे यांनी केले तर आभार सतीश शिंदे यांनी.
