आला पावसाळा!! रोगराईला सांभाळा !! – डॉ.शरदकुमार तेलगाणे
उदगीर (प्रतिनिधी) : पावसाळा म्हटले की पाण्यापासून होणाऱ्या आजाराला निमंत्रण असते, एका बाजूला पावसाळआ शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असला तरी पिण्याच्या पाण्या बाबत आपण काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी हेच जीवन , असे जरी म्हटले जात असले तरी मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे महत्व जास्त आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी व अस्वच्छ परिसर यामुळे समाजामध्ये आरोग्याच्या प्रमुख समस्या उद्भवतात. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता हा सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे.अशी माहिती डॉ.शारडकुमार तेलगणे यांनी दिली आहे
गावातील परिसर व वैयक्तिक स्वच्छतेची स्थिती ही पाण्याच्या गुणवत्तेसाठी प्रामुख्याने जबाबदार असते. काही वेळा स्रोतांमधून मिळणारे पाणी योग्य गुणवत्तेचे नसते, प्रथमतः पाण्याची गुणवत्ता समजून घेणे आणि त्यानंतर स्त्रोतापासून ते प्रत्यक्ष घटकापर्यंत पाण्याचा प्रवास समजून घेऊन ज्या ज्या ठिकाणी पाणी दूषित होण्याची शक्यता असते, तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते .जसे की मोठ्या पाईप लाईन ला लिकेज असणे, नळ कोंडाळे नसणे, नळ खड्ड्या मध्ये असणे, या प्रकारामुळे पिण्याचे पाणी जिवाणू व रासायनिक प्रदूषणापासून मुक्त राहू शकत नाही. याची काळजी घ्यावी.
नळाला तोट्या बसवाव्यात,पावसाचे पाणी जिवाणू व रासायनिक प्रदूषणापासून मुक्त आहे,मात्र नंतर इतर घटका मुळे प्रदूषित होते, जिवाणू प्रदूषणामुळे अतिसार, आमांश, विषमज्वर, कावीळ यासारखे आजार होतात. तर अमर्याद पाण्याचा उपसा, रासायनिक खतांचा वापर व औषधांची फवारणी, स्त्रोताच्या भोवती उकिरडे इत्यादी घटकांमुळे नायट्रेट चे प्रमाण वाडून लहान बालकात ब्लूबेबी सिंड्रोम यासारखा आजार होतो.
यामध्ये लहान बालकांचे ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. तर पाण्यात क्लोराइड चे प्रमाण वाढल्यास दातांचे विकार उद्भवतात. यामध्ये दात वेडेवाकडे होणे, दात ठिसूळ होणे, हाडांमध्ये बाक येतो. पाण्यात क्लोराइड व कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्यास मुतखडा , किडनी चे आजार, कॅन्सर इत्यादी आजार होतात . स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल. हे लक्षात ठेवावे व आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.असेही आवाहन डॉ. टेलगाणे यांनी केले आहे.
सर्वसामान्यपणे आपल्याला मिळणारे पाणी पावसापासून मिळते, ते आपल्या पर्यंत दोन प्रकारच्या अवस्थेमध्ये पोहोचते .एक नदी, तलाव , धरणे इत्यादी च्या माध्यमातून तर दुसरा स्त्रोत आहे जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत जसेकी, हातपंप, विद्युत पंप, वीहीरी, वगैरे निसर्गातून मिळणाऱ्या पावसाचे पाणी शुद्ध स्वरूपात असते हे पाणी आकाशातून जमिनीवर येताना त्यात हवेतील वायू व धूलिकण मिसळतात. तसेच जमिनीवरील प्रवास करताना त्यामध्ये विविध घटक भूगर्भातील विविध क्षारही मिसळतात. नैसर्गिकरीत्या पाणी काही प्रमाणात प्रदूषित होत असले तरी मानवनिर्मित कारणाने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, विविध प्रकारामुळे दूषित होते.
यामध्ये रासायनिक घटक आहेत, जैविक प्रदूषणाचे घटक आहेत आणि मानवनिर्मित कारणांमध्ये प्राधान्याने नदीत ,नाले ,ओढे ,झरे ,तळे ,बांध या ठिकाणचे पाणी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये शौचालयाचे पाणी सोडणे, आंघोळ करणे, पोहने, कपडे धुणे, गुरे ,जनावरे धुणे , कारखान्यातील टाकाऊ पदार्थ त्यात सोडणे, सांडपाणी ,मलमूत्र ,गटाराचे पाणी त्या पात्रात सोडणे ,मानव व पशू पक्षी यांचे मृतदेह पाण्यात सोडणे. अशा अनेक कारणामुळे पाणी प्रदूषित होते. या गोष्टींचा विचार करून अतिसार, आमांश, कॉलरा, कावीळ, विषमज्वर यासारखे रोग टालण्यासाठी शुद्ध पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पाणी उकळून ,गाळून थंड करून प्यावे. जेणेकरून पाण्यातील जिवाणू नश्ट होतील. असे आवाहन उदगीरचे प्रसिद्ध डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी केले आहे.
