स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलांना वाढदिवसाच्या निमित्ताने साडी वाटप..!
अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रणी असनारे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहराची स्वच्छता करणाऱ्या सर्व महिलांना तसेच विधवा महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आले. येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत केलेल्या अभीष्टचिंतन व साडी’चोळी वाटप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड होते तर प्रमुख पाहणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर स्वामी,मुख्याध्यापक मदने सर, माजी नगरसेवक शेषेराव ससाणे, रिपाई चे जिल्हाध्यक्ष दिगंबरराव गायकवाड,सामाजिक चळवळीतील अग्रणी नेते अण्णाराव सूर्यवंशी, पत्रकार सूरेश डबीर, कल्याणी साहेब आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाढदिवसाच्या निमित्ताने कांही हटके आणी समाजहिताचे उपक्रम असावेत या हेतूने सम्राट मित्रमंडळाच्या वतीने सर्व प्रथम सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, शहीद टिपू सुलतान, गोपीनाथराव मूंडे,हुतात्मा स्मारक येथे उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मौजे काळेगांव येथील तक्षशिला बूध्द विहार येथे बुध्द पुजापाठ घेण्यात आली.शहरातील बौध्द स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले. पूढे ग्रामीण रूग्णालय येथे रूग्नांना फळवाटप करण्यात आले.सूखमणी वृद्धाश्रम येथे सामूहीक भोजनदान आणी शेवटी स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिला आणी विधवा महिला यांना साडी वाटप आणी अभीष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली. सूत्रसंचालन पत्रकार विलास चापोलीकर यांनी मानले तर आभार अजय भालेराव यांनी मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान पठाण, दादासाहेब देशमूख,अजिंक्य चामे, शिवाजी भालेराव, शेख हाशमभाई, भारतीय बौध्द महासभेचे तालूकाध्यक्ष मनिष क्षिरसागर, रमेश कांबळे सभापती प्रशांत जाभाडे, आकाश सांगवीकर, पत्रकार अजय भालेराव, शरद सोनकांबळे, शिक्षकनेते गिरीश गोंटे,ॲड.राजपाल गायकवाड, शरद सुर्यवंशी, प्रदिप कांबळे,शरद बनसोडे, कैलास भालेराव, इंद्रजीत गुंजरगे, महेश कदम, गणेशराव मुंढे, मुकेश मोरे,अजय वाघमारे, आनंद सोनकांबळे, सचिन बानाटे, किरण जाधव, सयाजी गायकवाड, राहुल सुर्यवंशी, लहूजी शक्तीसेनेचे तालूकाध्यक्ष मुकुंद वाघमारे,मोहम्मद पठाण आदींची उपस्थिती होती.
